बीड दि.१३ (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यासह शहरात देखील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.मागील दहा - बारा दिवसांपासून ही संख्या झपाट्याने वाढत आहे.बीड शहरात दोन प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत आहेत. नागोबा गल्ली पेठ बीड व मोमीनपुरा, ढगे कॉलनी बीड या केंद्रातून आपल्या आरोग्य विभागाच्या आरोग्य विषयक सर्व उपक्रम सतत राबविले जात आहेत. गरीब लोकांची वस्ती असलेल्या या भागात ही प्राथमिक केंद्रे कार्यरत आहेत.
या केंद्रातून कोविड-१९ ची लसीकरण केंद्रे लवकरात लवकर सुरू करावीत जेणेकरून त्या त्या परिसरातील गरजू नागरिकांना लस घेणे सोयीचे होईल.तसेच शहरात अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू झाल्याने सध्या सुरू असलेल्या लसीकरण केंद्रावर तसेच यंत्रणेवर अधिकचा पडणारा ताण कमी होईल व लसीकरण करणे सर्वांच्याच दृष्टीने सुसह्य होईल,त्यामुळे शहरातील नागोबा गल्ली, मोमीनपुरा, ढगे कॉलनी या दोन प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण केंद्र सुरू करून बीड शहरातील नागरिकांची सोय करावी, अशी मागणी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी बीड जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
बातमी शेअर करा