बीड : महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील रुग्णालयांमध्ये ८० % खाटा या केवळ कोरोनासाठीच राखून ठेवाव्यात असे निर्देश आरोग्य हमी सोसायटीने दिल्यानंतर बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील जन आरोग्य योजनेशी संबंधित रुग्णालयांमधील खाटा राखून ठेवण्याचे आदेश काढले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात ७३६ खाटा नव्याने उपलब्ध होणार आहेत या रुग्णालयांमध्ये कोरोनाग्रस्तांना योजनेतून उपचार घेता येणार आहेत.
या रुग्णालयांमध्ये मिळणार खाटा
रुग्णालयाचे नाव गाव राखीव खाटा
विठाई हॉस्पिटल बीड ४०
वीर हॉस्पिटल बीड ३६
घोळवे हॉस्पिटल बीड ३२
स्पंदन हॉस्पिटल बीड ३२
लाईफलाईन हॉस्पिटल बीड ३२
यशवंतराव जाधव मेमोरियल बीड २८
तिडके हॉस्पिटल बीड २८
प्रशांत हॉस्पिटल बीड २४
मातोश्री हॉस्पिटल बीड २४
शुभदा हॉस्पिटल बीड २४
पॅराडाईज हॉस्पिटल बीड ३९
कृष्णा हॉस्पिटल बीड २४
केशरबाई क्षीरसागर हॉस्पिटल बीड २९
काकू नाना मेमोरियल बीड ५६
माणिक हॉस्पिटल गेवराई ४०
साबळे सर्जिकल माजलगाव ४०
मुंडे बाल रुग्णालय परळी ८०
कराड हॉस्पिटल परळी ४०
संत ज्ञानेश्वर हॉस्पिटल परळी ४०
श्रेया हॉस्पिटल केज २४
योगिता नर्सिंग बालरुग्णालय केज २४