Advertisement

वेतनासाठी स्वच्छता कर्मचाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

प्रजापत्र | Wednesday, 07/04/2021
बातमी शेअर करा

अंबाजोगाई-तीन महिन्यापासून वेतन रखडल्याने वैतागलेल्या स्वछता कर्मचाऱ्याने बुधवारी दुपारी अंगावर पेट्रोल ओतुन आत्मदहनाचा प्रयत्न केला.हा प्रकार मुख्याधिकारी यांच्या दालना समोर घडला.वेतना विना कोविड योद्धेच संकटात सापडले आहेत.
अंबाजोगाई नगर परिषदेतील स्वछता विभागात ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत असलेला कर्मचारी विनोद बळीराम सरवदे  यांनी बुधवारी दुपारी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेऊन काडी ओढत असताना उपस्थित सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना रोखले.त्यामुळे पुढील अनर्थ टळला.सरवदे हे गेल्या अनेक वर्षांपासून स्वछता विभागात कार्यरत आहेत.गेल्या तीन महिन्यां पासून त्यांचा पगार न झाल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहेत.रखडलेले वेतन मिळावे यासाठी त्यांनी नगर परिषद प्रशासनाकडे पाठपुरावा करून ही समस्या मार्गी लागत नसल्याने त्यांनी आत्मदहनाचे पाऊल उचलले.
कोरोनाच्या काळात स्वछतेचे काम करणारे कोरोना योद्धेच वेतनाविना काम करत आहेत. हि दुर्देवी वेळ कर्मचाऱ्यांवर आली आहे. या संदर्भात नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले की मी कोरोनाच्या बेठकीसाठी गेलो होतो. त्या वेळी हा प्रसंग घडला.या बाबत सविस्तर माहिती घेऊन हा प्रश्न निकाली काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

Advertisement