सक्रिय रुग्णांचा आकडा साडे तिनशे पार
बीड : जिल्ह्यात कोरोना ग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढू लागली असून बुधवारी पाठविण्यात आलेल्या अहवालामध्ये तब्बल 58 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामुळे जिल्ह्यातील कोरोना ग्रस्तांची एकूण संख्या 697 वर पोहचलेली असताना सक्रिय रुग्णांची संख्या देखील 357 झाली आहे. बुधवारी पॉझिटिव्ह आलेले रुग्ण बीड, परळी, आष्टी, अंबाजोगाई आणि गेवराई तालुक्यातील आहेत.
बीड जिल्ह्यात आता कोरोना ग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बुधवारी आत्तापर्यंतचे सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. बुधवारी पाठविण्यात आलेल्या अहवालातील तब्बल 58 जण पॉझिटिव्ह आले. यापूर्वी एकाच दिवशी 66 अहवाल पॉझिटिव्ह आले होते मात्र ते दोन दिवसातील स्वॅबचे होते. त्यामुळे आजच्या अहवालांनी पुन्हा एकदा जिल्ह्याला धक्का बसला आहे.
आज पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये बीड तालुक्यातील 30 मध्ये काझी नगर भागातील 4 यासह गणेश नगर, शाहुनगर, लाटे कॉम्प्लेक्स, बागवान गल्ली, धनराज कॉलनी, विप्रनगर, शांतीनिकेतन इंग्लिशस्कुलसमोर, मंत्री कंन्स्ट्रक्शन, कामखेडा येतील 3 तर धावज्याचीवाडी येथील 1 समावेश आहे. परळी तालुक्यातील 13 रुग्णांमध्ये शिवाजीनगर, पद्मावती गल्ली, नाथनगर, येथील प्रत्येकी एक तर हमालवाडी येथील 4 आणि धर्मापूरी येथील 4 व टोकवाडीच्या एका रुग्णाचा समावेश आहे. आष्टी तालुक्यातील 7 सर्व लोणी सय्यदमीर, पाटोदा तालुक्यातील महेंद्रवाडी, अंबाजोगाई तालुक्यातील निर्पाणा व शहरातील चौघे व गेवराई तालुक्यातील दोघांचा समावेश आहे.
रुग्णांचा तालुकानिहाय आकडा व ठिकाण पुढील प्रमाणे