Advertisement

बीड शहरातील १० रुग्णालयातील २०% खाटा कोरोनासाठी आरक्षित

प्रजापत्र | Sunday, 04/04/2021
बातमी शेअर करा

बीड-बीड जिल्ह्यात सातत्याने वाढत असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी बीड शहरातील महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना लागू असणाऱ्या १० रुग्णालयातील २० % खाटा कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी राखून ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
             बीड शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आता शहरातील १० रुग्णालयांमधील खाटा आरक्षणाचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. यात विठाई हॉस्पिटल (१० ), वीर हॉस्पिल (९) , घोळवे हॉस्पिटल (५ ), स्पंदन हॉस्पिटल (८ ) लाईफ लाईन हॉस्पिटल ( ८ ), यशवंतराव जाधव मेमोरियल हॉस्पिटल (७ ) तिडके हॉस्पिटल ( ७ ), प्रशांत हॉस्पिटल (६ ), मातोश्री हॉस्पिटल (६ ), शुभदा हॉस्पिटल ( ६ ) अशा ७२ खाटा राखून ठेवण्यात आल्या आहेत.या रुग्णालयांनी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून राखीव खतानावर कोरोना रुग्णांना उपचार द्यावेत असे आदेश जिल्हाधिकारी जगताप यांनी काढले आहेत. 

 

Advertisement

Advertisement