बीड -शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून या अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी एसपींच्या पथकाने धडक मोहीम हाती घेतली आहे. काल शिरूर तालुक्यातील थोरात वस्ती येथील बाळासाहेब कोंडीराम घोरपडे यांच्या घरा शेजारी मोकळ्या जागेत जुगार अड्डा सुरू होता. एसपींच्या विशेष पथकाने या जुगार अड्ड्यावर धाड टाकून ११ जुगारी तिर्रट नावाचा जुगार खेळत असल्याचे आढळून आले. या वेळी जुगाराचे साहित्य, नगदी एक लाख १ हजार ९२० रुपये, वाहने, मोबाईल असा एकूण ४ लाख ५५ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची चर्चा होत आहे. स्थानिक पोलीसांना या संदर्भात नागरिकांनी माहिती देऊनही ते अशा अवैध धंद्यांवर कारवाई करत नसल्याचे बोलले जात होते. त्यामुळे या अवैध धंद्याचा सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. काल एसपींच्या विशेष पथकाला थोरात वस्ती येथे जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी सायंकाळी त्याठिकाणी धाड टाकली. या वेळी तेथे अकरा जुगारी जुगार खेळताना मिळून आले.
बाळासाहेब कोंडीराम घोरपडे (रा. थोरात वस्ती ता. शिरूर), शेख अन्ववर शेख इस्माईल (रा. मुस्लीम गल्ली, शिरूर), भाऊसाहेब भगवान सुळे (रा. झापेवाडी ता. शिरूर), दत्ता अण्णासाहेब तांबे (रा. राक्षसभुवन ता. शिरूर), राजेंद्र कालीदास डोके (रा. सुतारनेट गल्ली शिरूर), अशोक भाऊराव बांगर (रा. पिंपळनेर ता. शिरूर), विष्णू एकनाथ पवार (रा. झापेवाडी), साईनाथ आदिनाथ कदम (रा. कन्होबाचीवाडी, शिरूर), दीपक दत्तात्रय खोले (रा. राक्षसभुवन), राजेंद्र विठ्ठल अंदुरे (रा. दगडेगल्ली ता. शिरूर), गोरख गेणा वीर (रा. सवासवाडी ता. शिरूर) या अकरा जुगार्यांना पोलीसांनी ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात शिरूर पोलिस ठाण्यात गु.र.नं. ३६/२०२१ भा.दं.वि.कलम १८८, २६९, २७० सह कलम ५१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.