Advertisement

कोरोनाचा गुणाकार वेग घेतोय

प्रजापत्र | Tuesday, 28/07/2020
बातमी शेअर करा

कोरोनाचा गुणाकार वेग घेतोय
बीड- जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून आज पाठवलेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यात 37 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.मागील काही दिवसांपासून सुरु असलेला कोरोनाचा गुणाकार थांबण्याचे नाव घेत नाहीये.

बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 600 च्या घरात गेली असली तरी 302 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 275 एवढी आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत बीड आणि परळी या दोन ठिकाणी अधिक रुग्ण संख्या असून त्यापाठोपाठ गेवराई अंबाजोगाई आष्टी पाटोदा केज धारूर या तालुक्यात बाधित रुग्णसंख्या आहे तर शिरूर आणि वडवणी याठिकाणी रुग्णसंख्या कमी आहे. आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

बीड तालुक्यात 21, परळी 5, अंबाजोगाई 8, गेवराई 2, आष्टी 1 इतके रुग्ण आढळून आले आहेत.

 

 

 

Advertisement

Advertisement