अंबाजोगाई-आपणांस फोन करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात विराज धिमधीमे (रा.अंबाजोगाई)यांनी अंजली राम घाडगे (रा.केज) यांच्याविरुद्ध पीएनसी/2020 कलम 507 भादंवि नुसार गुन्हा दाखल झाला आहे.अंजली राम घाडगे यांच्याविरूद्ध सदर गुन्हा दाखल झाल्याने राजकीय व सामाजिक वर्तुळातून आश्चर्य व्यक्त होत आहे.
विराज धिमधीमे यांनी नोंदविलेल्या पोलिस फिर्यादीत म्हटले आहे की,गुरूवारी(दि.23) दुपारी एक वाजेच्या सुमारास आपण हॉटेल अनिलच्या बाजूस रूख्माई अर्बन बँक येथे असताना केज येथील अंजली राम घाडगे यांनी आपणांस फोन करून तुला व तुझ्या कुटुंबास गायब करून टाकीन असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद अंबाजोगाई येथील विराज धिमधिमे (वय 28 वर्षे) रा.फुलेनगर,ता. अंबाजोगाई यांनी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात शुक्रवार,दिनांक 24 जुलै रोजी दाखल केली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार तुपारे हे करीत आहेत.
प्रजापत्र | Tuesday, 28/07/2020
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा