आष्टी-बीड जिल्ह्यात शुक्रवारी लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी आष्टीत आ.सुरेश धस आणि व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका सर्व दुकाने उघडली होती.यानंतर उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे,आ.सुरेश धस आणि व्यापाऱ्यांमध्ये बैठक पार पडली.या बैठकीत व्यापाऱ्यांनी प्रशासनापुढे तीन पर्याय ठेवले होते.यात पहिला पर्याय म्हणजे 'नो लॉकडाऊन'.दुसरा पर्याय २९ मार्चपर्यंत आम्ही सर्व नियम आम्ही पाळतो त्यानंतर ३० मार्चपासून लॉकडाऊन मागे घ्या आणि तिसरा पर्याय म्हणजे लॉकडाउनच्या १० दिव्त दुकाने दुपारी १ पर्यंत उघडण्यास परवानगी द्या असे मुद्दे मांडण्यात आले होते.
दरम्यान उपविभागीय अधिकारी श्री.शिंदे यांनी व्यापारी आणि आ.सुरेश धस यांच्या आक्रमकतेपुढे नरमाईची भूमिका घेत २९ मार्चनंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन दिल्यानंतर व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद केली