बीड जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात ज्या व्यक्तींना अथवा सुविधांना प्रवासाची मुभा देण्यात आलेली आहे. त्यासाठी प्रशासनाकडून प्रवासाच्या पासेस दिल्या जाणार आहेत. यात 10 वी 12 वी आणि विद्यापीठाच्या परिक्षार्थींना त्यांचे प्रवेशपत्र हीच पास समजली जाईल तर शेतकर्यांनाही घरापासून शेतापर्यंत ट्रॅक्टरचा वापर करणेस वगेळी परवानगी लागणार नाही. आरोग्याच्या कारणावरुन किंवा इतर सुविधांसाठी, ज्यात औषध पुरवठा आणि इतर गोष्टींचा समावेश होतो त्यांना तहसीलच्या पातळीवर पास देण्याची सुविधा करण्यात आली आहे. याच ठिकाणाहून परवाना ओळखपत्र देखील दिले जातील. प्रत्येक तहसील कार्यालयात यासाठी दोन कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच तहसील पातळीवर अडचणी निर्माण झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातही पास देण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली असल्याचे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी म्हटले आहे. प्रत्येक तहसीलमधील दोन कमचार्यांच्या व्हॅट्सअॅप क्रमांकावर आणि इमेल आयडीवर परवान्यासाठीचा अर्ज करता येणार असून 24 तासाच्या आत संबंधीतांना परवानगी दिली जाईल.
पाससाठी यांच्याशी साधावा लागेल संपर्क