बीड – एकीकडे अँटिजेंन टेस्ट न केल्याने महसूल आणि पोलीस प्रशासन दुकानं सील करण्याची करवाई करत असताना दुसरीकडे टेस्ट करायला गेलेल्या व्यापाऱ्यांना चार चार चकरा मारून देखील कर्मचारी जागेवर सापडत नसल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे .
बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा गेल्या महिनाभरात झपाट्याने वाढला,त्यामुळे प्रशासनाने १५ मार्च पर्यत व्यपाऱ्यांनी अँटिजेंन टेस्ट करण्याचे आदेश दिले होते .मात्र अनेक व्यपाऱ्यांनी याकडे पाठ फिरवली .
२२ मार्च पर्यत संधी देऊन देखील व्यपाऱ्यांनी टेस्ट न केल्याने शेवटी सोमवारपासून प्रशासनाने दुकानांना सील लावण्याची मोहीम हाती घेतली .माळीवेस,बशीरगंज सुभाष रोड,भाजी मंडई भागात काही दुकाने सील केली .या कारवाईनंतर व्यापऱ्यांमध्ये खळबळ उडाली .
या कारवाईचा धसका घेत मंगळवारी अनेक व्यापाऱ्यांनी आयटीआय मध्ये अँटिजेंन टेस्ट करण्यासाठी धाव घेतली .मात्र या ठिकाणी कर्मचारी हजर नसल्याने व्यापाऱ्यांना दोन चार चकरा माराव्या लागल्या .या ठिकाणी कर्मचारी असतात तर किट संपलेले असते,किट असेल तर रिपोर्ट साठी दुसऱ्या दिवशी बोलावले जाते .त्यामुळे टेस्ट केली तर हे हाल आणि नाही केले तर प्रशासनाची कारवाई अशा दुहेरी कात्रीत व्यापारी सापडले आहेत .