अंबाजोगाई दि.१८ (वार्ताहर)-किराणा दुकानात वही आणण्याकरीता आलेल्या आठ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या दुकान मालकास अपर सत्र न्यायालयाचे न्या.श्रीमती पटवारी यांनी गुरुवारी (दि.१८) पाच वर्ष सश्रम करावास व २५ हजार दंडाची शिक्षा सुनावली आहे.
२३ मे २०१७ रोजी सकाळी १०.३० वाजता पीडिता ही किराणा दुकानात वही आणण्याकरीता गेली असता, यातील आरोपी किराणा दुकान मालक शेख सिराज शेख मुन्सी (वय-२५ वर्ष, रा.मियाभाई कॉलनी) याने मुलीस घरात बोलावून अश्लील चाळे केले. पीडिता ही रडत असतांना दुकानाचे शटर वाजल्याने आरोपीने पीडितेस सोडून दिले. यानंतर पीडितेने सदरील प्रकार आपल्या आईला सांगितल्यानंतर पीडिता,तिची आई आणि साक्षीदार हे आरोपीस जाब विचारण्यासाठी गेले असता शिवीगाळ केली. यानंतर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल आनंद यांच्याकडे देण्यात आला. तपासीक अधिकारी यांनी तपासांती आरोपीताविरुध्द दिसून येत असलेल्या सबळ पुराव्याच्या आधारावर मा.न्यायालयास अंतीम दोषारोप पत्र सादर केले.सुनावणीअंती आरोपीताविरूध्द दिसून आलेल्या सबळ पुराव्याच्या आधारावर न्यायालाने आरोपीस पाच वर्ष सश्रम करावासाची शिक्षा सुनावली आहे. तसचे आरोपीस २५ हजार दंड सुनावून दंडाची रक्कम फिर्यादीस देण्यात यावी असा निर्णय दिला. सदर प्रकरणात सरकारी पक्षाची बाजू सहा.सरकारी वकील श्री आर. एम. ढेले यांनी मांडली तर पैरवीचे कामकाज पोउपनि अर्जुन चौधर यांनी पाहिले.
बातमी शेअर करा