सिरसाळा-सध्या जिल्ह्यात वाळू माफियांवर पोलीस अधीक्षकाच्या पथकाने कारवाईचा बडगा उगारला असून बुधवारी (दि.१७) पहाटे सिरसाळा परिसरात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या तीन हायवावर कारवाई करण्यात आली.
सिरसाळा परिसरात मोहा रोडवर अवैध वाळू वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलीस अधीक्षकाच्या पथकाला पहाटे ३.३० च्या सुमारास झाल्यनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास हजारे यांच्या पथकाने वाळू वाहतूक करणारे तीन हायवा ताब्यात घेतले.यामध्ये ७२ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तीन चालकांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
बातमी शेअर करा