Advertisement

अल्पवयीन मुलीवर बलात्कार आरोपीस 20 वर्षे सक्तमजुरी

प्रजापत्र | Tuesday, 16/03/2021
बातमी शेअर करा

बीड  :  येथील विशेष पोक्सो न्यायालयाचे न्यायाधीश  एम.व्ही. मोराळे  यांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात आरोपी लव उर्फ राहूल चांदणे यास 20 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे. प्रकरणात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अ‍ॅड.मंजुषा एम. दराडे यांनी काम पाहिले.  बीड येथे राहणार्‍या एका अल्पवयीन मुलीवर बीड येथेच राहणारा लव उर्फ राहूल चांदणे याने बलात्कार केला होता. त्यानंतर सदर मुलगी गरोदर राहिली होती व तिने एका मुलास जन्मही दिला होता. सदर घटनेमुळे अल्पवयीन मुलीने पेठ बीड पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती. त्यावेळी आरोपी राहुल चांदणे याचेविरुध्द कलम 376 भादंवि व कलम 3,4,5(जे) पोक्सो कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. यानंतर पेठ बीड पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक श्री बनकर यांनी प्रकरणाचा तपास करुन बीड येथील विशेष पोक्सो न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

 

   बीड येथील विशेष पोक्सो न्यायालयाचे न्यायाधीश मोराळे  यांच्या समोर चालले.सरकार पक्षातर्फे सदर प्रकरणात एकूण 4 साक्षीदार तपासण्यात आले, प्रकरणात सरकार पक्षातर्फे सादर करण्यात आलेल्या भक्कम पुराव्याच्या आधारे व विशेष सरकारी वकील अ‍ॅड. मंजुषा दराडे यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन मोराळे  यांनी आरोपी लव उर्फ राहुल चांदणे यास कलम376(2) व कलम 4 पोक्सो अंतर्गत दोषी धरून त्यास कलम 4 पोकसो कायद्या अंतर्गत 20 वर्षाची शिक्षा व दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने शिक्षा तसेच कलम 506(2) भादंविमध्ये सहा महिने शिक्षा व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साध्या कैदेची शिक्षा ठोठावली आहे. सदर प्रकरणी सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. मंजुषा एम.दराडे यांनी कामकाज पाहिले. 

Advertisement

Advertisement