Advertisement

दिलासा : कोरोनाचे रुग्ण वाढले पण  घटतोय मृत्युदर

प्रजापत्र | Tuesday, 16/03/2021
बातमी शेअर करा

बीड : जिल्ह्यात मागील आठवड्यापासून कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने एका भीतीचे सावट निर्माण झाले आहे, मात्र त्यातही दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी मृत्युदर कमी होत आहे. मागील आठवड्यातील मुर्त्यूदर त्या पूर्वीच्या आठवड्याच्या तुलनेत कमी झळायचे चित्र आहे. तर जिल्ह्यातील एकूण रुग्णांपैकी तब्बल ९७ % रुग्णांमध्ये कसलीच लक्षणेही आढळून आलेली नाहीत .
राज्यभरात कोरोना संसर्ग वाढत असल्याचे चित्र आहे. रोज बाधितांचे समोर येणारे आकडे धडकी भरविणारे आहेत, मात्र त्याचवेळी तपासण्यांची संख्या देखील मोठ्याप्रमाणावर वाढली आहे, त्यामुळे हे आकडे वाढत आहेत. मागील आठवड्यात जिल्ह्यात तब्बल १०९३ रुग्ण सापडले, त्यापूर्वीच्या आठवड्यात हीच संख्या ५७३ इतकी होती. रुग्णसंख्या इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढली असली तरी दिलासादायक बाब म्हणजे मागील आठवड्यात  कोरोनाबळींचे प्रमाण त्या पूर्वीच्या तुलनेत कमी झाले आहे. या पूर्वी आठवडाभरात ५७३ रुग्ण सापडले त्यावेळी आठवड्यात ९ बाली गेले होते, मागील आठवड्यात १०९३ नवीन रुग्ण सापडले तर ४ बळी  नोंदवले गेले.
आजघडीला जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ९४८ इतकी आहे. असे असले तरी आजघडीला तब्बल ९७% रुग्ण लक्षणे नसलेले आहेत तर अर्धा टक्का रुग्णांमध्येच गंभीर लक्षणे आहेत .

Advertisement

Advertisement