Advertisement

मांजरसुंब्याच्या घाटात ट्रक-टेम्पोचा अपघात ; तीन गंभीर जखमी

प्रजापत्र | Saturday, 13/03/2021
बातमी शेअर करा

बीड-तालुक्यातील मांजरसुंबा घाटात आज पहाटे ०५:३० वाजता ट्रक आणि टेम्पो चा अपघात घडला सुदैवाने जिवित हानी टळली परंतू यामधील तीघेजण गंभीर जखमी झाले तर एक किरकोळ जखमी आहे. त्यांना उपचारासाठी बीड येथील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
सविस्तर असे की,बीड तालुक्यातील मांजरसुंब्याच्या घाटात आज पहाटे ०५:३० वाजता ट्रक क्रमांक जी.जे.११ व्ही.व्ही.४९५९ व आयशर टेम्पो क्रमांक एम.एच.१३ आर.३७५४ चा अपघात झाला. दोन्ही गाड्या बीडकडुन-सोलापुरकडे जाताना आयशर टेम्पोच्या समोरून चालत असलेला टाईल्सची वाहतुक करणारा ट्रक अचानक इंडिकेटर न देता आडवा आला आणि अचानक ब्रेक लावल्याने आयशर टेम्पो पाठीमागून धडकला यामध्ये टेम्पोतील तिघे गंभीर रित्या जखमी झाले असून एकाला किरकोळ दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी बीड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असल्याची माहिती महामार्ग पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे.

 

Advertisement

Advertisement