Advertisement

मळणी यंत्रात अडकून महिलेचा मृत्यू

प्रजापत्र | Thursday, 11/03/2021
बातमी शेअर करा

शिरूर- मळणी यंत्राच्या सहाय्याने  शेतातील गहू काढताना यंत्रामध्ये अडकून एका ३४ वर्षीय महिलेने मजुरीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शिरूर (कासार) तालुक्यातील राक्षसभुवन येथे बुधवारी रात्री घडली आहे. तालुक्‍यातील राक्षसभुवन येथे चव्हाण मळ्यात बुधवार दि.(१०) रोजी नऊच्या सुमारास गहू ट्रॅक्टर चलीत मळणी यंत्रा मधून काढत असताना वर्षा तात्यासाहेब तांबे (वय ३४) महिलेचा मळणी यंत्रात पदर गुंतल्याने शरीराचा अर्धा भाग मळणी यंत्र जाऊन जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळावर येऊन सदरील पंचनामा केला. मळणी यंत्रात अडकलेल्या महिलेची अवस्था अत्यंत बिकट असल्याने पोस्टमार्टम ही जागेवरच करण्यात आले. सदरील महिला हलाखीच्या परिस्थितीत अत्यंत मेहनती होती. या घटनेन तालुक्यात हळहळ व्यक्त होय आहे. याबाबत शिरूर पोलीस ठाण्यात अद्याप मृत्यूची नोंद झाली नसून पुढील तपास बीट अंमलदार सानप करीत असल्याची माहिती आहे.

Advertisement

Advertisement