Advertisement

परिवर्तन घोटाळयातील मुख्य आरोपी आलझेंडे न्यायालयात शरण

प्रजापत्र | Tuesday, 09/03/2021
बातमी शेअर करा

माजलगावः येथील 'परिवर्तन' मल्टीस्टेच्या घोटाळयातील प्रमुख आरोपी असलेला    विजय   आलझेंडे अखेर मंगळवारी माजलगावच्या न्यायालयासमोर शरण आला. परिवर्तन गैरव्यवहारात तब्बल ११ गुन्हे दाखल असुन त्यात आलझेंडे तब्बल अडीच वर्षांपासून फरार होता.
मराठवाडयाला हादरवुन सोडलेल्या परिवर्तन मल्टीस्टेट मधील सुमारे ५० कोटीच्या घोटाळयात ११ गुन्हे दाखल आहेत. पुर्वाश्रमीचा शिक्षक असलेला, त्यानंतर नगरसेवक झालेला    विजय    आलझेंडे हा परिवर्तनचा अध्यक्ष होता आणि या गुन्हयांमधिल प्रमुख आरोपी आहे. गुन्हे दाखल झाल्यापासून तब्बल अडीच वर्षांपासून आलझेंडे फरार होता. मागील आठवड्यापासून आर्थीक गुन्हे शाखेचे पथक एपीआय सुजीत बडेंच्या नेतृत्वात आलझेंडेच्या मागावर होते. या पार्श्वभूमीवर आलझेंडेंने मंगळवारी माजलगावच्या न्यायालयात शरणागती पत्करली आहे.

Advertisement

Advertisement