Advertisement

शालेय विद्यार्थीनीची आत्महत्या

प्रजापत्र | Tuesday, 09/03/2021
बातमी शेअर करा

 किल्लेधारूर-२४ तास उलटत नाहीत तेच धारुर तालुक्यात दुसऱ्या आत्महत्या उघडकीस आली आहे. तालुक्यातील अंजनडोह येथे सातवीच्या वर्गातील शालेय विद्यार्थीनी रेणूका शंकर रेपे वय 13 वर्ष हिने  सोमवारी सांयकाळचे वेळी घरातील आढू ला गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी धारूर पोलीस  स्टेशनला अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
तालुक्यातील भोपा येथे काल दि.8 रोजी सकाळी तरुणाने आत्महत्या केली होती. तेच आज अंजनडोह येथील नुतन माध्यमिक विद्यालयातील सातवी वर्गात शिकणारी रेणुका शंकर रेपे (13) या मुलीने घरात कोणी नसताना सोमवारी सांयकाळचे वेळी घरातील आढूला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. या आत्महत्येचे  कारण समजू शकले नाही. या घटने मुळे मात्र सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी धारूर पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली.
काही दिवसांपुर्वी याच अंजनडोह गावात वयोवृध्द शेतकऱ्याने घरासमोरील हनुमान मंदिरात गळफास घेतल्याची घटना घडली होती. यानंतर तालुक्यात आत्महत्येचे सत्र सुरुच असल्याचे दिसुन येते. अवघ्या सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीने टोकाचे पाऊल का उचलले याबाबत माहिती मिळु शकली नाही. सदरील आत्महत्या  प्रकरणाचा  पुढील तपास पोलीस हे. कॉ. अनंत अडागळे करत आहेत.

Advertisement

Advertisement