Advertisement

मालमत्तेच्या वादातून छोट्या भावाने केला मोठ्याचा खून

प्रजापत्र | Monday, 08/03/2021
बातमी शेअर करा

माजलगाव- तालुक्यातील पात्रूडमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सोमवारी (दि.8) रोजी रात्री 8 च्या सुमारास मालमत्तेच्या कारणावरून छोट्या भावाने मोठ्या भावाचा चाकू भोकसून खून केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
येथील तेलगाव रोडवर शेख इर्शाद शेख शकील (वय 30) व त्यांचा लहान भाऊ शेख आर्शद शेख शकील यांचा मोबाईल शॉपीचा व्यवसाय आहे. या दोघांमध्ये मालमत्तेच्या कारणावरून सतत वाद होत असायचा. सोमवारी रात्री 8 च्या सुमारास हा वाद टोकाला गेला आणि यातून लहान भाऊ शेख आर्शदने शेख इर्शादच्या पोटात चाकू भोकसून खून केला. घटनेची माहिती समजताच माजलगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. माजलगाव ग्रामीण पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Advertisement

Advertisement