Advertisement

जिल्हाधिकारी यांनी घेतली कोरोना प्रतिबंध लस

प्रजापत्र | Saturday, 06/03/2021
बातमी शेअर करा

बीड - जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी आज दि.६ रोजी शासकीय जिल्हा रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी दक्षता घ्यावी व गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळून मास्क,सॅनिटायझरचा वापर करावा.
कोरोना प्रतिबंधक लस घेतल्या नंतर त्याचा कोणताही दुष्परिणाम होत नसून सर्वांसाठी लस उपलब्ध होणार असल्याचे देखील सांगितले.लसिकरण आणि कोरोना प्रतिबंधक उपाय योजनांचा देखील जिल्हाधिकारी यांनी यावेळी आढावा घेतला.

Advertisement

Advertisement