प्रतिनिधी / केज
एका २५ वर्षीय विधवा महिलेच्या घरात घुसून तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देत नराधमाने तिच्यावर बळजबरीने बलात्कार केल्याची घटना केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पोलिसांनी बलात्कार करणाऱ्या नारायण प्रल्हाद तांदळे ( रा. कोरेगाव ता. केज ) या नराधमास अटक केली आहे.
केज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील २५ वर्षीय ही आपल्या लहान मुलासह सासरी राहत आहे. २७ फेब्रुवारी २०२१ रोजी रात्री आठ वाजता पीडित महिला ही आपल्या मुलासह एकटीच असल्याची संधी साधून आरोपी नारायण प्रल्हाद तांदळे ( रा. कोरेगाव ता. केज ) हा तिच्या घरात घुसला. त्याने तिच्या लहान मुलास जीवे मारण्याची धमकी देऊन पीडित महिलेच्या तोंडावर टॉवेल लावून बळजबरीने बलात्कार केला. ४ मार्च रोजी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी नारायण तांदळे याच्याविरुध्द केज पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे हे पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना आरोपी नारायण तांदळे याला जेरबंद केले. पीडितेला उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले असून आरोपीला आज ५ मार्च रोजी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याची माहिती तपासी अधिकारी सपोनि संतोष मिसळे यांनी दिली.
बातमी शेअर करा