महारुद्र वाणी
लिंबागणेशः कोरोनाच्या बेरोजगारिचे पडसाद आता उमटु लागले असुन कोरोनामुळे रोजगार गेला, ज्या वयात आई वडीलांना सांभाळायच, त्या वयात आपण त्यांच्यावर भार होतोय या नैराश्याच्या भावनेतून एका ४५ वर्षीय इसमाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मसेवाडी ता. बीड येथे घडली आहे. चिंतामन मांडवे असे त्या ईसमाचे नाव आहे.
चिंतामन मांडवे (वय ४५) हे पुणे आणि औरंगाबाद येथे खाजगी चालक म्हणून काम करत होते. मात्र कोरोनाच्या टाळेबंदीत त्यांची नोकरी गेली आणि एप्रिल महिन्यात ते पत्नी आणि मुलांसह आपल्या गावी मसेवाडी येथे आईवडीलांकडे आले होते. आल्यापासून ते अस्वस्थ होते. या वयात आपण आई वडीलांवर भार होतोय ही भावना त्यांना अस्वस्थ करत होती आणि त्यातुनच सोमवारी रात्री त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.
ते पहिल्या पासुन बाहेर राहिले, त्यामुळे शेतीच्या कामाची सवय देखील सुटली होती,त्यातच आता काय करायचे या विचारात ते कायम असायचे आणि यातुनच त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांची पत्नी अर्चना यांनी सांगितले.
चिंतामन यांच्या पश्चात आई वडील, पत्नी आणि तीन मुले असा परिवार आहे.
बातमी शेअर करा