Advertisement

कापसाच्या गोडावून ला आग

प्रजापत्र | Tuesday, 02/03/2021
बातमी शेअर करा

 बीड – बीड जालना महामार्गावर असलेल्या वेअर हाऊसला लागलेल्या भीषण आगीत तब्बल 75 कोटी रुपयांचा कापूस आणि गाठाण जळून भस्म झाल्या आहेत .रात्री बारा वाजण्याच्या सुमारास लागलेली आग दहा तासांनंतर सुद्धा आटोक्यात आली नव्हती .

बीडपासून जवळच असलेल्या जप्ती पारगाव परिसरात शासकीय वेअर हाऊस आहे .या ठिकाणी शासनाने खरेदी केलेल्या तब्बल 21 हजार पेक्ष्या जास्त कापूस गठाणी आणि खाजगी व्यापाऱ्यांच्या सहा ते सात हजार कापूस गठाणी होत्या. ज्याची मार्केट किंमत 75 कोटींच्या आसपास आहे .

ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही,आग एवढी भीषण होती की जिल्हाभरातील चाळीस पेक्ष्या जास्त अग्निशमन विभागाचे बंब या ठिकाणी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत .
 

Advertisement

Advertisement