आष्टी- तालुक्यातील हाजीपुर येथील शेतात कापूस वेचणी करत असताना चंद्रभागा महादेव राख (वय ६०) या महिलेवर रानडुकराने हल्ला करून गंभीर जखमी केले. आज (दि.25) ही घटना घडली असून या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
हाजीपूर येथील चंद्रभागा राख या आपल्या राहत्या घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शेतात कापूस वेचत असताना अचानक समोरून रान डुकराने हल्ला करुन डाव्या पायाच्या मांडीवर चावा घेत लचका तोडला आहे.हे रानडुक्कर पिसलेले आहे का? असा प्रश्न गावकऱ्यांतुन होत आहे. तर या परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.या डुक्कराचा वनविभागाने तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.महिलेवर आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून महिलेचे प्रकृती स्थिर आहे.
बातमी शेअर करा