Advertisement

परळीकरांना काहीसा दिलासा,३४५ मध्ये ५ पॉझिटिव्ह

प्रजापत्र | Sunday, 12/07/2020
बातमी शेअर करा

बीड-परळी शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या संपर्कातील सुमारे दीड हजार लोकांना क्वारंटाईन  करण्यात आले होते. आणि त्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते.शनिवारी यातील ४३१ नमुन्यांचा अहवाल प्रलंबित होता. त्याचा अहवाल रविवारी उशिरा आला असून यात ५ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. ३४५ मध्ये ५ नमुने पॉझिटिव्ह आल्याने परळीकरांसाठी काहीसा दिलासा असल्याचे चित्र असून परळी परिसरात सामूहिक संसर्गासारखी परिस्थिती नसल्याचे दिसत आहे. परत आणखी ३४० संभाव्य रुग्णांचे नमुने रविवारी तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्याचा अहवाल मध्यरात्री नंतर अपेक्षित आहे. या सर्व नमुन्यांचा अहवाल आल्यानंतरच परळी शहरातील लॉकडाऊन बाबत काही निर्णय अपेक्षित आहे,त्यामुळे देखील या अहवालांकडे सर्वांचे लक्ष आहे.शनिवारच्या प्रलंबित नमुन्यांमधील पॉझिटिव्ह आलेल्या ५ रुग्णांमध्ये ब्रह्मवाडी ता.परळी,विद्यानगर परळी,इंदिरानगर परळी,पेठ मोहल्ला परळी येथील एसबीआयच्या ग्राहकांसह अंबाजोगाईच्या सिराज कॉलनीमधील एका महिलेचा समावेश आहे.  
 

Advertisement

Advertisement