Advertisement

राहुल रेखावारांची पुन्हा बदली

प्रजापत्र | Wednesday, 24/02/2021
बातमी शेअर करा

बीड : बीडचे माजी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची पुन्हा एकदा बदली झाली असून त्यांना आता उमेद च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून थेट महाबीजमध्ये हलविण्यात आले आहे. रेखावार यांना २ महिन्यात दोन वेळा बदलीला सामोरे जावे लागत आहे.
बीडचे माजी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची जानेवारी महिन्यात बीडहून बदली झाली होती. त्यांना काही काळ नियुक्तीशिवाय ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना उमेदीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती देण्यात आली होती. मात्र या पदावर काही दिवस होत नाहीत तोच रेखावार यांना महाबीजमध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. अत्यंत कमी दिवसाचा कार्यकाळ मिळालेले ते उमेद मधील पहिलेच वरिष्ठ अधिकारी असावेत 

 

Advertisement

Advertisement