Advertisement

बीड जिल्ह्यात शाळांबाबत काय झाला निर्णय ?

प्रजापत्र | Wednesday, 24/02/2021
बातमी शेअर करा

बीड-राज्याच्या अनेक भागात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शाळा,महाविद्यालये बंद केली जात असतानाच बीड जिल्ह्यातही दहावी आणि बारावीचे वर्ग वगळता इतर शाळा,महाविद्यालये तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात येत आहेत. तसा प्रस्ताव  बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे . 
राज्याच्या अनेक भागात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद केल्या जात आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यातही या संदर्भात काय निर्णय होतो याकडे सर्वांच्या नजर लागल्या होत्या. विशेष म्हणजे चार  दिवसापूर्वी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्येच मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी आम्ही शाळांसंदर्भात निर्णय घेत आहोत असे संकेत दिले होते . त्यानुसार आता जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील दहावी आणि बारावीचे वर्ग वगळता इतर सर्व माध्यमांच्या सर्व शाळा तात्पुत्रत्या स्वरूपात बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ही शाळा बंदी १० मार्च पर्यंत प्रस्तावित करण्यात आली आहे. 

 

Advertisement

Advertisement