Advertisement

बँक, पणन आणि इतर शेती मतदारसंघात रंगणार लढत

प्रजापत्र | Tuesday, 23/02/2021
बातमी शेअर करा

बीडः जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सोसायटी मतदारसंघात उमेदवारच नसले तरी बँका-पतसंस्था, पणन संस्था आणि इतर शेती या ३ मतदारसंघात मात्र चुरस राहणार आहे.
बँका पतसंस्था मतदारसंघ हा विद्यमान अध्यक्ष आदित्य सारडा यांचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघासाठी आदित्य सारडा यांच्यासह राजकिशोर मोदी, संगिता अशोक लोढा, दिपक घुमरे आदिंसह ११ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहेत. तर पणन संस्था मतदारसंघावर अमरसिंह पंडीत गटाचे परंपरागत वर्चस्व राहिलेले आहे . या मतदारसंघात भाऊसाहेब नाटकर,आसाराम मराठे, जगदिश काळे,रामदास खाडे यांच्यासह ६ उमेदवार पात्र ठरले आहेत तर इतर शेती मतदारसंघात देखिल चांगली लढत अपेक्षित आहे.

Advertisement

Advertisement