Advertisement

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली

प्रजापत्र | Tuesday, 23/02/2021
बातमी शेअर करा

बीड-मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढू लागल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर येत आहे.जिल्ह्यात २० रुग्ण पॉझिटिव्ह येत असताना आता पुन्हा कोरोनाचे अर्धशतक होऊ लागल्याचे दिसून येते. 
           मंगळवारी जिल्ह्यात ४७ पॉझिटिव्ह आले असून यात बीडमध्ये सर्वाधिक २३ रुग्णांचा समावेश आहे. तर अंबाजोगाई १२,आष्टी १,धारूर २,गेवराई ३,केज ३,परळी २ आणि वडवणीत १ रुग्ण आढळून आला.तर ५५६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून १६ रुग्णांनी कोरोनावर मात केली.  

Advertisement

Advertisement