Advertisement

उपजिल्हाधिकाऱ्यासह चालकाला पोलीस कोठडी

प्रजापत्र | Friday, 19/02/2021
बातमी शेअर करा

माजलगावः वाळुच्या गाडया चालु देण्यासाठी लाच घेतल्याच्या प्रकरणात माजलगावचे उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड सह चालक काळे यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने उपजिल्हाधिकारी गायकवाडसह चालकास ६५ हजाराची लाच घेताना गुरुवारी रात्री अटक केले होते.
गुरुवारी रात्री जालना एसीबीने माजलगावमध्ये सापळा रचुन उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड आणि त्यांच्या चालकास अटक केले होते. एका वाळु व्यापाऱ्याच्या तक्रारीवर हा सापळा रचण्यात आला होता. उपजिल्हाधिकारी गायकवाड यांच्यासाठी ६५ हजाराची लाच घेताना चालकास पकडण्यात आले होते आणि त्यानंतर गायकवाड यांना अटक करण्यात आली होती.
दरम्यान उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यांच्यासह चालकाला आज माजलगाव न्यायालयासमोर उभे करण्यात आले. यावेळी न्यायालयाने दोन्ही आरोपींना ३ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. या कारवाईने महसूल विभाग हादरला आहे.

Advertisement

Advertisement