Advertisement

शाळकरी मुलीची छेडछाड करून प्राणघातक हल्ला

प्रजापत्र | Monday, 15/02/2021
बातमी शेअर करा

   अंबाजोगाई- परळीतील एका ८ वीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीची छेडछाड करून तिच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्या.श्रीमती सापटनेकर यांनी आरोपीस दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ३० हजार दंड व पीडितेस २५ हजार नुकसान भरपाई देण्याचे आदेश सोमवारी (दि.१५) दिले. 
                 परळीतील एका आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीची सतिश वसंत मंत्रे याने छेड काढली होती.पीडिता शाळेत जात असताना तिचा पाठलाग करून आरोपीने छेड काढली व नंतर तिला जीवे मारण्याची धमकी दिली.यानंतर पीडितेने घडलेला प्रकार आपल्या घरच्यांना सांगितल्यानंतर आरोपीला समजावून सांगण्यात आले.मात्र त्यानंतर २३ जानेवारी २०१७ रोजी आरोपी सतिश मंत्रे याने पुन्हा पीडिता शाळेत जात असताना तिचा रस्ता आडवून तू तुझ्या घरच्यांना माझ्यांबद्दल काय सांगितलेस असे म्हणत चाकूने पोटावर वार केले.व नंतर तिच्या डोक्यात दगड घालून खून करण्याचा प्रयत्न केला.मात्र यावेळी परिसरातील नागरिकांनी त्याला पकडले व परळी पोलिसांच्या स्वाधीन केले.सदर प्रकरणात आरोपीवर कलम ३०७,३५४ अ,३४१,५०४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.याप्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक डी.बी.काळे यांनी केला.सदर खटला अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्या.श्रीमती सापटनेकर यांच्या पुढे चालविण्यात आला.यावेळी सरकारी पक्षातर्फ ८ साक्षीदार तपासण्यात आले. दरम्यान गुन्ह्याबद्दल आरोपीला १० वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ३० हजार दंड व पीडितेला २५ हजार नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. सरकारी पक्षातर्फे ऍड.ए.व्ही.कुलकर्णी यांनी बाजू मांडली.त्यांना ऍड.डी.डी.लांब व ऍड.एन.एस.पुजदेकर व पैरवी चौधरी यांनी सहकार्य केले.

Advertisement

Advertisement