Advertisement

 भेगाळलेले पाय आणि घायाळ मन,तरीही.....आ.धनंजय मुंडेंची फेसबुक पोस्ट चर्चेत

प्रजापत्र | Monday, 07/09/2026
बातमी शेअर करा

 बीड : मागच्या दीड वर्षात सातत्याने मीडिया ट्रायल आणि राजकीय चढ उतारांना सामोरे जात असलेले राज्याचे माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी जिम मधील व्हिडीओसह फेसबुकवर केलेली एक पोस्ट सध्या चर्चेत आहे. सातत्याने संघर्षाला सामोरे जात असलेले आ. मुंडे यांनी 'भेगाळलेले पाय आणि घायाळ मन , अजूनही धैर्य टिकवून आहे ' असे सांगत केलेली ही पोस्ट त्यांच्या कोणत्या पर्वाचा 'श्रीगणेशा ' आहे का अशा चर्चा आता राजकीय विश्व्वट होत आहेत.
महाराष्ट्रातील मोजक्या फायरब्रॅन्ड नेत्यांपैकी एक म्हणून राष्ट्रवादीचे नेते आ. धनंजय मुंडे यांच्याकडे पाहिले जाते. राज्यात विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते असतानाची असेल किंवा मंत्री म्हणून, राजकीय परिघातील कार्यकर्ता म्हणून त्यांची कारकीर्द नेहमीच वादळी राहिली. मात्र मागच्या दीड वन राजकीय विजनवास आणि टोकाची टीका , मीडिया ट्रायल आदी गोष्टींना सामोरे जावे लागले. त्याची खंत देखील आ. मुंडे यांनी यापूर्वी काही ठिकाणी बोलून दाखविली होती. मात्र या खंत व्यक्त करण्यापलीकडे जाऊन आ. धनंजय मुंडेंनी पुन्हा आक्रमक भूमिका घ्यावी अशी भावना त्यांच्या संमर्थकांमध्ये आहे. अशातच आता आ. धनंजय मुंडे यांनी आज (दि. ७ ) सकाळी जिम मधील व्यायामाच्या व्हिडीओसह एक फेसबुक पोस्ट  पोस्ट केली आहे. त्यांच्या या पोस्ट मधून त्यांनी त्यांना झालेल्या वेदना आणि त्यांच्यातील धैर्य याचे सूचकपणे केलेले विधान आता चर्चेचा विषय ठरले आहे.' हरवण्याची आता बिशाद कुणाची , स्वतःशी सुद्धा लढतो आहे ' असे सांगणाऱ्या या पोस्टमधून आ. धनानंजय मुंडे यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या असल्या तरी त्यासोबतच  त्यांनी सांगितलेले 'पुढचे पाऊल ' कोणते असणार याची उत्सुकता आता राजकीय वर्तुळात आहे. 

Advertisement

Advertisement