Advertisement

संतप्त आंदोलकांनी सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग रोखला

प्रजापत्र | Sunday, 06/09/2026
बातमी शेअर करा

जालना : मराठा-कुणबी ५८ लाख नोंदी, जात प्रमाणपत्र तसेच इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली येथे ११ वे उपोषण २९ ऑगस्टला सुरू केले. आज त्यांच्या आंदोलनाचा ९ वा दिवस आहे. जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली असून त्यांनी उपचारास नकार दिला आहे. रात्री वैद्यकीय तपासणीसाठी आलेल्या पथकाला त्यांनी दोन वेळेस माघारी पाठवले. दरम्यान जरांगे पाटलांची प्रकृती खालावत असल्यामुळे संतप्त आंदोलकांनी आज वडिगोद्री येथे सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग रोखला होता. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये तणावाचे वातारण दिसून आले.

Advertisement

Advertisement