Advertisement

चार सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या जिल्ह्यातून बदल्या

प्रजापत्र | Thursday, 03/09/2026
बातमी शेअर करा

बीड दि.३ (प्रतिनिधी)-पोलीस दलातील बदल्यांचे सत्र अजूनही चालूच असून चार सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या गुरुवारी (दि.३) झाल्या आहेत.बीड जिल्हयात नवीन अधिकारी मिळणार का हे पाहण्यासाठी  छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे प्रमुख वीरेंद्र मिश्रा यांच्या यादीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
      बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये भार्गव सुदाम सपकाळ (नागपुर परिक्षेत्र),गोरक्षनाथ बाबासाहेब दहिफळे (नागपूर परिक्षेत्र),ज्ञानेश्वर कचरू थोरात (छत्रपती संभाजीनगर शहर) आणि मच्छिन्द्रनाथ गंगाधर शेंडगे (नवी मुंबई) यांचा समावेश असून छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रात आठ अधिकारी आले आहेत.यातील एका दोन अधिकाऱ्यांची बीडमध्ये बदली होण्याची देखील शक्यता आहे.आता छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे प्रमुख वीरेंद्र मिश्रा बदल्यांमध्ये बीडच्या वाट्याला कोणत्या अधिकारी देतात हे लवकरच स्पष्ट होईल.  

जिल्ह्यातून दोन पोलीस निरीक्षकांच्या होणार बदल्या?
सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांची यादी एकीकडे जाहीर झाली असताना आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षकांची देखील बदल्यांची यादी जाहीर होणार आहे.या यादीमध्ये बीड जिल्ह्यातून दोन पोलीस निरीक्षकांची नावे असतील अश्या देखील चर्चा आहेत.येत्या दोन-चार दिवसात बदल्यांचे चित्र स्पष्ट होईल असा देखील अंदाज आहे.

Advertisement

Advertisement