आष्टी दि.14 (वार्ताहर) : तालुक्यातील नागतळा येेेथिल सोनवणे वस्तीवर भरदिवसा घरफोडी झाल्याची घटना रविवारी (दि.14) दुपारी 2 च्या सुमारास समोर आली आहे. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी शेतकरी शिवाजी सोनवणे यांच्या घरातून लाखाचा ऐवज लंपास केला. रात्री उशीरापर्यंत या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
शेतकरी शिवाजी बाबाजी सोनवणे हे आपल्या कुटुंबासह रविवारी सकाळी शेतात ज्वारी काढण्यासाठी गेले होते. यावेळी घरी कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडीकोंडा तोडत घरात प्रवेश केला. यावेळी घरातील कपाटाचे कुलूप तोडून पाच ग्राम सोन्याची अंगठी, दोन ग्राम मणी, चांदीचा घोडा, चांदीचे कडे, चांदीच्या दोन अंगठ्या आणि रोख पंधरा हजार अशी लाखाची रक्कम लंपास केली. दुपारी 3 च्या सुमारास ही घटना समोर आल्यानंतर अंमळनेर पोलीसांना घटनेची माहिती देण्यात आली. रात्री उशीरापर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
बातमी शेअर करा