Advertisement

दुचाकीच्या भिषण अपघात एक ठार

प्रजापत्र | Thursday, 03/09/2026
बातमी शेअर करा

 बीड दि.३(प्रतिनिधी): नाथापुर येथून गावी पिंपळटक्का येथे जात असतांना बेडकूचीवाडी शिवारात पाठीमागून येणाऱ्या दुचाकीने जोराची धडक दिली या अपघात दुचाकीवरील तरूणाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्याची घटना बुधवार (दि.२) रोजी घडली असून दोघे जखमी झाले आहेत.

  वडवणी तालुक्यातील पिंपळटक्का येथील नितीन तुळशीराम कदम (वय ३९) हे बुधवार (दि.२) रोजी सायंकाळी ४ च्या सुमारास दुचाकी क्रमांक एम.एच.१०.डी.जे.१३०२ वरून पत्नी कुसूम कदम यांच्यासोबत नाथापूर येथून गावी जात होते. बेडकूचीवाडी शिवारात त्यांच्या दुचाकीला पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या दुसऱ्या दुचाकी क्रमांक एम.एच.१४. सी.झेड.९०९३ ने जोराची धडक दिली.या अपघातात नितीन कदम हे गंभीर जखमी झाले होते तर त्यांच्या पत्नी कुसूम कदम आणि दुसऱ्या दुचाकीवरील चालकाच्या पाठीमागे बसलेले रणजित दुबळे हे जखमी झाले. नितीन कदम यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना वडवणी येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतांना काल रात्री उशिरा त्यांचा मृत्यु झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी बीड जिल्हा रूग्णालयात आणण्यात आला होता.

Advertisement

Advertisement