Advertisement

  मराठा आरक्षणासाठी पुन्हा मुंबईकडे कूच

प्रजापत्र | Monday, 31/08/2026
बातमी शेअर करा

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यातील वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला मुंबईकडे जाण्याचे आवाहन केले आहे. “आजपासून मराठा बांधवांनी मुंबईकडे जायला सुरुवात करा आणि १२ तारखेपर्यंत मुंबईत पोहोचा,” असे आवाहन त्यांनी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना केले.जरांगे पाटील यांनी कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने एकाच वेळी मुंबईत न जाता हळूहळू मुंबईकडे जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईत पोहोचल्यानंतर सुरुवातीला पाहुण्यांकडे राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Advertisement

Advertisement