Advertisement

गुटखा वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

प्रजापत्र | Saturday, 29/08/2026
बातमी शेअर करा

 बीड दि.२९(प्रतिनिधी): शहरातील शिवराज पान सेंटर चौकात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध गुटखा रिक्षातून वाहतूक करणाऱ्या एका तरुणावर कारवाई करत त्याच्याकडून १ लाख ४ हजार रुपयांचा विविध कंपन्यांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.
    शहरातील बसस्थानक ते बार्शी नाक्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील शिवराज पान सेंटर चौकात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वडवणीकडे जाणाऱ्या रिक्षामध्ये राहुल उर्फ राहत सतीश वावधने (वय ३२)रा.सिंदफणा शाळेसमोर वडवणी ता,वडणवी जि बीड हा विविध कंपन्यांचा गुटखा आर्थिक फायद्यासाठी चोरट्या पद्धतीने विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगून त्याची वाहतूक करताना आढळून आला.पोलिसांनी त्याच्याकडील  १ लाख ४ हजारांचा विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करून आरोपीला शुक्रवार (दि.२८) रोजी सकाळी १०.१५ वाजता ताब्यात घेतले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत,अपर पोलीस अधीक्षक समीर शेख,उपविभागीय पोलीस अधिकारी वेंकटराम आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि श्री.खटावकर,श्री.यादव,मनोज परजणे, अशपाक सय्यद, आणि चालक श्री.वडमारे यांच्या पथकाने केली.

 

Advertisement

Advertisement