Advertisement

जिल्हापरिषद निवडणुकांच्या संदर्भाने सर्वोच्च न्यायालयातून मोठी अपडेट

प्रजापत्र | Thursday, 27/08/2026
बातमी शेअर करा

बीड (प्रजापत्र न्यूज)-बीडसह राज्यातील २० जिल्हापरिषदांच्या प्रलंबित निवडणुका (ZP election) आता या वर्षी होण्याची शक्यता धूसर झाली आहे. यासंदर्भाने सर्वोच्च न्यायालयात (supreme court) प्रलंबित असलेल्या याचिकेवरील सुनावणी आता दिर्घकाळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्सीय पिठासमोर आता २९ ऑक्टोबर रोजी या याचिकेवरील सुनावणी होणार आहे.त्यानंतरच या निवडणुकांच्या संदर्भाने काही आदेश येण्याची शक्यता आहे.त्यामुळे चालू वर्षात निवडणूक होईल असे चित्र नाही.
बीडसह राज्यातील २० जिल्हापरिषदांच्या आणि त्या अंतर्गत असलेल्या पंचायत समित्यांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत.ओबीसी आरक्षणाची (OBC  reservation) टक्केवारी आणि ५० % आरक्षण मर्यादा यामुळे या निवडणुका घेता आलेल्या नाहीत.यासंदर्भातील वेगवेगळ्या याचिकांची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. १८ ऑगस्ट रोजी सदर प्रकरण सुनावणीला ठेण्यात आले होते,मात्र त्यावेळी हे प्रकरण सुनावणीला पोहचलेच नाही. तेव्हापासून या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात पुढील तारीख कोणती दिली जाते याची प्रतिक्षा आणि उत्सुकता सर्वांना होती.आता यात न्यायालयाकडून पुढील तारीख स्पष्ट करण्यात आली असून या प्रकरणाची पुढील सुनावणी २९ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
या याचिकांमध्ये अद्याप राज्य निवडणूक आयोगाने आपले म्हणणे सादर केलेले नसून त्यानंतर दोन्ही बाजूनी युक्तिवाद होणार आहे, त्यामुळे एकाच तारखेत यात काही निर्णय होण्याची शक्यता नाही.त्यामुळे आता चालू वर्षी म्हणजे २०२६ मध्ये या प्रलंबित निवडणुका होतील अशी शक्यता जवळपास मावळली असून २०२७ मध्ये तरी निवडणुका होणार का हा प्रश्न सामान्यांना पडलेला आहे. 

 

Advertisement

Advertisement