मुंबई दि.२७(प्रतिनिधी): महापालिका आणि नगरपालिकांप्रमाणे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्येही स्वीकृत अर्थात नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करता येणार आहे. ग्रामविकास विभागाने यासंदर्भातील अधिसूचना जारी केल्याने नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. संबंधित पक्षांच्या संख्याबळानुसार या सदस्यांची निवड केली जाणार असून, त्यामुळे स्थानिक पातळीवरील राजकीय कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे. राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये तब्बल १ हजार ५ नामनिर्देशित सदस्यांची भर पडणार आहे.
बातमी शेअर करा

