मुंबई : सामाजिक न्याय विभागाच्या निधीतील मुख्यमंत्री लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) योजनेसाठी पुन्हा एकदा महिला व बाल विकास विभागाकडे निधी वळवला आहे. सामाजिक न्याय विभागाचे ३४४ कोटी मुख्यमंत्री लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) योजनेसाठी वळवले आहेत, सामाजिक न्याय विभागाचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेसाठी महायुती सरकारने पुन्हा सामाजिक न्याय विभागाच्या निधी वळवला आहे. या योजनेतील लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या तरतुदीतून ३४४.७४ कोटी रुपये महिला व बालकल्याण विभागाकडे वळवण्यात आले आहेत. सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला. लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून या योजनेसाठी सातत्याने सामाजिक न्याय विभाग तसेच आदिवासी विकास विभागाचा कोटींचा निधी वळवला जात आहे. त्याचा परिणाम या दोन्ही विभागांच्या इतर योजनांवर जाणवू लागला आहे.

प्रजापत्र | Tuesday, 25/08/2026
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा
