Advertisement

आंतरजिल्हा सराईत टोळी जेरबंद 

प्रजापत्र | Wednesday, 19/08/2026
बातमी शेअर करा

 बीड दि.१९(प्रतिनिधी): वडवणी पोलीस ठाणे हद्दीत दाखल असलेल्या जबरी चोरीच्या दोन गुन्ह्यांचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला आहे. या प्रकरणी दोन सराईत आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याकडून एक लाख रुपये किमतीची टाटा सुमो गाडी जप्त करण्यात आली आहे.
 स्थानिक गुन्हे शाखेचे पथक माजलगाव उपविभागात मंगळवार (दि.१८) रोजी पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मिथुन साळवे, रोहन केकाण आणि त्यांचा एक साथीदार यांनी हे गुन्हे केले असून ते पांढऱ्या रंगाच्या टाटा सुमोमधून लव्हुळ रोडमार्गे पात्रुडच्या दिशेने येत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी पात्रुड व तेलगाव परिसरात वाहनाचा पाठलाग केला. यावेळी दोघांना एका शेतातून शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी आपली नावे मिथुन दादाराव साळवे (वय २५) रा. रमाई नगर, वडवणी,आणि रोहन कल्याण केकाण (वय २५)रा. जुना मोंढा, वडवणी) अशी सांगितली.पोलिसांनी अधिक चौकशी केली असता दोघांनी वडवणी हद्दीतील दाखल असलेल्या दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या ताब्यातून एमएच २३ ई ६५४४ क्रमांकाची टाटा सुमो, किंमत अंदाजे एक लाख रुपये, जप्त करण्यात आली. या कारवाईमुळे वडवणी पोलीस ठाणे हद्दीतील दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.

Advertisement

Advertisement