Advertisement

कारच्या धडकेत एक ठार

प्रजापत्र | Monday, 17/08/2026
बातमी शेअर करा

 बीड दि.१७(प्रतिनिधी):रोड ओलांडून पलिकडे जात असतांना भरधाव वेगात येणाऱ्या कारने जोराची धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या वृध्दाचा मृत्यु झाल्याची घटना आज सकाळी १०.३० च्या सुमारास मांजरसुंबा-चौसाळा रोडवरील उदंडवडगाव शिवाजीनगर वस्ती येथील राष्ट्रीय महामार्गावर घडली.

   बीड तालुक्यातील उदंडवडगाव येथील चंद्रकांत वाघिरे (वय ८०) हे आज सकाळी १०.३० च्या सुमारास तेथीलच शिवाजीनगर वस्ती येथील राष्ट्रीय महामार्गाचा रस्ता ओलांडून जात होते. त्याचवेळी मांजरसुंब्याकडून भरधाव येणाऱ्या कारने वाघिरे यांना जोराची धडक दिली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisement

Advertisement