Advertisement

अंबाजोगाई तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने तिघांचा मृत्यू, मुलानंतर वडिलांचे दुर्दैवी निधन......!

प्रजापत्र | Saturday, 13/02/2021
बातमी शेअर करा

अंबाजोगाईत दि.१३ - कोरोना हद्दपार होत असताना पुन्हा तालुक्यात रुग्न संख्येत वाढ होत असुन भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.  शनिवारी  एकाच दिवसात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना शहरात घडली  शहरातील एका शिक्षकाचा प्रथम दर्शनी कोरोना पॉजीटिव रिपोर्ट आला मात्र नंतर निगेटिव रिपोर्ट आल्यानंतर त्याचे वडिल भाऊ चे रिपोर्ट पॉजिटिव आल्याने शिक्षक मुलगा घाबरुन हद्यविकाराच्या झटक्याने गुरुवारी राञी निधन झाले, ते 40 वर्षाचे होते. तर     शुक्रवारी त्यांच्या पार्थीवावर अंतिम संस्कार केले असता शनिवारी रक्षा सावडण्याच्या अगोदरच वडीलांचा मृत्यू कोरोनानेच झाला त्यामुळे कुटुंबावर दु: खाचा डोंगर कोसळला. 

          दरम्यान त्याच कुटुंबातील एक मुलगा व मयत मुलाची आई रुग्नालयात कोरोनाशी लढत आहेत.  तर घरातील व्यक्तीचा मृत्यू  झाला मात्र घरातीलच व्यक्तीला अंत्यविधीला उपस्थित राहता आले नाही असे दुर्दैवी चित्र आज दिसून आले.

 

एकाच वेळी तिघांची चिता

 

आज दि. 13 फेब्रुवारी रोजी शहरातील सर्वे नंबर 17 मध्ये दोन दिवसापूर्वी 40 वर्षाच्या शिक्षक मुलाचा मृत्यू झालेल्या 80 वर्षीय वडीलांचा मृत्यू कोरोनाने झाला आहे. शहरातील मंगळवार पेठ भागातील एका 64 वर्षीय व्यक्तीचाही आज मृत्यू झाला आहे.तालुक्यातील (ममदापूर पाटोदा) येथील 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळे झाला असून एकाच दिवशी अंबेजोगाई तालुक्यातील तिघांचा मृत्यू झाल्यामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Advertisement

Advertisement