अंबाजोगाई दि.२०(प्रतिनिधी): तालुक्यातील भावठाणा येथे २८ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून, या घट ने मुळे गावात शोककळा पसरली आहे.
अक्षय श्रीकिसन (वय २८) रा. भावठाणा ता. अंबाजोगाई याने शनिवार (१८) रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरी पंख्याच्या हुकाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. हा प्रकार लक्षात येताच जाधवच्या नातेवाईकांनी त्यांना तातडीने स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय,अंबाजोगाई येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या आत्महत्ये मागील कारण अस्पष्ट असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
बातमी शेअर करा

