गेवराई दि.१८(प्रतिनिधी): तालुक्यातील जातेगाव,गोंदी (खु.) येथे अवैध वाळूची वाहतुक होत असल्याची माहिती गेवराई पोलीसांना मिळताच अशोक लेलँड पिकअप व ट्रॅक्टर या दोन्ही वाहनावर गुरुवार (दि.१६)रोजी कारवाई करत ११ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गेवराई तालुक्यातील जातेगाव रोडवरील कुलकर्णी हॉस्पिटलजवळ विनानंबरचा अशोक लेलँड बडा दोस्त पिकअप अवैधरित्या वाळू वाहतूक करताना गुरुवार (दि.१६)रोजी पकडण्यात आला. या कारवाईत वाहनासह वाळू असा ६ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोउनि .राम खोत करत आहेत.त्यानंतर त्याच दिवशी सकाळी ९:१५ वाजता गोंदी (खु.) येथे दुसऱ्या कारवाईत विनानंबरचा अर्जुन महिंद्रा ट्रॅक्टर व डंपिंग ट्रॉली अवैध वाळू वाहतूक करताना आढळून आला. या कारवाईत ५ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोह.अशोक हुंबर्डे करत आहेत.सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके,पोनी किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि राम खोत,हिमांशू नागरे,कल्याण राठोड,अशोक हुंबर्डे,गोरक्ष डोके,धीरज खांडेकर व चालक इसाक शेख यांनी केली.

बातमी शेअर करा
