Advertisement

भर बाजारात अल्पवयीन मुलीची काढली छेड

प्रजापत्र | Friday, 17/07/2026
बातमी शेअर करा

  गेवराई दि.१७(प्रतिनिधी): कुटुंबासह आठवडी बाजारला आलेल्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन भर बाजारात छेड काढली याबाबत जाब विचारणाऱ्या पीडितेच्या मामाला मारहाण करुन डोकं फोडून जखमी केल्याची घटना पाचेगाव येथे घडली. याप्रकरणी चौघांवर अॅट्रॉसिटी, पोक्सो कायद्यानुसार गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
 गेवराई तालुक्यातील पाचेगाव येथे गुरुवार(दि.१६) एका गावातील १६ वर्षीय मुलगी कुटुंबातील काही जणांसोबत बाजारासाठी आली होती. यावेळी चार जणांनी पाठला करीत भर बाजारात हात पकडून व लज्जा वाटेल असे कृत्य केले. यानंतर मुलीने हाताला झटका देऊन सुटका करुन घेतली आणि गावाकडे जाणाऱ्या रिक्षाजवळ आत्या आणि मामा थांबलेले होते. तिथे थांबली तेथून नंतर ते रिक्षात गावाकडे जाताना पुन्हा ते चौघे दुचाकीवरून आले आणि पुन्हा छेडछाड केली. यानंतर पीडितेचे मामा यांनी खाली उतरून का छेडता म्हणून जाब विचारला असता आरोपींनी डोक्यात काठी मारुन जखमी केले. तसेच दुसऱ्या दोघांनी हातात दगड घेऊन शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून गेवराई पोलीस ठाण्यात आरोपी अमर संतराम पवार, अजय पावर आणि दोन अनोळखी असे चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपाधीक्षक करीत आहेत.

Advertisement

Advertisement