अंबाजोगाई दि.७(प्रतिनिधी): येथील महावितरण कार्यालयातील कार्यकारी अभियंता मनीष ढाकरे यांना मंगळवार (दि.७)रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पाच हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले.
सविस्तर माहितीनुसार, तक्रारदार यांचा एक प्लांट आहे.त्यासाठी ट्रान्सफॉर्मर बसविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. या प्रस्तावावर सही करून मंजुरी देण्यासाठी कार्यकारी अभियंता मनीष डाकरे यांनी पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदारांनी याबाबत बीड एसीबीकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी करून एसीबीने सापळा रचला. त्यानुसार मंगळवार (दि.७) रोजी ढाकरेंनी तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना कार्यालयातून रंगेहाथ ताब्यात घेतले. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.

