दिल्ली : मनरेगाच्या बदली विकसित भारत रोजगार आणि उपजिविका गॅरंटी योजना अर्थात वीबी-जीरामजी संपूर्ण देशात बुधवारपासून लागू झाली आहे. याचबरोबर केंद्र सरकाराने ग्रामीण भागातील मजदूरी करणाऱ्यांना या योजनेअंतर्गत किती मेहनताना मिळणार आहे याचे दरपत्रक देखील प्रसिद्ध केलं आहे.
आता देशात कोणत्याही राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात मजदूरीचा मेहनताना हा ३०० रूपये प्रतीदिनच्या खाली असणार नाही. आता ज्या राज्यात यापूर्वी मेहनताना कमी होता त्या राज्यांना याचा जास्त फायदा मिळणार आहे. यात उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तराखंड, आसाम आणि बंगाल या मुख्य राज्यांचा समावेश आहे. या राज्यात मेहनताना १५ ते २५ टक्के वाढण्याची शक्यता आहे.अधिसूचना जारी झाल्यानंतर देशात सरासरी दिवसाची मजुरी ही जवळपास २९९ रूपयांपासून वाढून ३२७ रूपयांपर्यंत जाणार आहे. आता दिवसाच्या मजुरीत सरासरी २८ रूपये वाढ झाली आहे. राष्ट्रीय स्तरावर हा वाढीचा दर १० टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
सरकारने पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तरावर मजुरी ही प्रतीदिन किमान ३०० निश्चित केली आहे. यापूर्वी अनेक राज्यांचा मजुरी दर हा ३०० रूपयांपेक्षा कमी होता. आता अधिसूचना जारी झाल्यानंतर सर्व मजुरी दर हे ३०० रूपयांच्या पार गेले आहेत. याचा लाभ २१ राज्ये आणि प्रशासकीय भागातील लाखो ग्रामीण मजुरांना मिळणार आहे.सरकारने मजुरी दर वाढण्यासोबतच रोजगार हमी देखील वाढवून वर्षाला १२५ दिवस केली आहे. त्यामुळं आता पात्र ग्रामीण कुटुंबाच्या तुलनेत आता २५ दिवस अधिक दिवस काम मिळणार आहे. वाढलेला मेहनताना आणि रोजगाराची हमी वाढल्यामुळं याचा थेट परिणाम ग्रामीण कुटुंबांवर पडणार आहे. नव्या व्यवस्थेनुसार सर्व राज्यांना एकसारखी मजुरी वाढ देण्यात आलेली नाही. ज्या राज्यात पहिल्यापासून मजुरीचा दर कमी होता तिथं जास्त वाढ दिली आहे. यामुळे उत्तर भारतातील राज्यांना याचा अधिक लाभ होणार आहे.हरियाणामध्ये नव्या मजदुरी दरानुसार प्रतिदिन ४०९ रूपये मिळणार आहेत. तर केरळमध्ये ४०१ आणि गोव्यात ४०६ रूपये प्रतिदिन मेहनताना मिळणार आहे. कर्नाटक आणि पंजाबमध्ये देखील मेहनताना हा ३६० पासून ४०९ रूपयांपर्यंत मिळणार आहे.

